सौदी अरेबिया एअरलाइन्स(अरबी: الخطوط الجوية العربية السعودية, इंग्रजी: Saudi Arabian Airlines) ही सौदी अरेबियाची राष्ट्रीय विमान कंपनी आहे. सौदी अरेबियन एअरलाइन्सचे मुख्य केंद्र जेद्दाहमधील किंग अब्दुल्ला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, तर इतर मुख्य विमानतळ रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि किंग दमन फाक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.
सौदी अरेबिया एअरलाइन्सअरब हवाई वाहतूक संघटनेचा सदस्य आहे.